अखेर मुहूर्त मिळाला!! या खास दिवशी ‘पुष्पा 2’ चा टीझर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. मध्यंतरी रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातली होती. या चित्रपटातील ‘फ्लावर नही फायर हू मे’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. यातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले होते. त्यामुळे “पुष्पा 2” चित्रपट (Pushpa 2 Movie) कधी रिलीज होणार हा प्रश्न प्रेक्षकांकडून परत विचारला जात होता. अखेर या चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट स्वतः अल्लू अर्जुनकडून देण्यात आली आहे.

नुकतीच अल्लू अर्जुनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये त्याने ‘पुष्पा 2’ चा टीझर (Pushpa 2 Teaser) कधी रिलीज होणार याची माहिती दिली आहे. अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये आपल्याला पायात घुंगरु बांधलेला व्यक्ती दिसत आहे. तसेच, या पोस्टरवर 8.4.24. अशी तारीख देखील दाखवण्यात आली आहे. तर पोस्टरवर Teaser On 8.4.24. असे म्हणले आहे. म्हणजेच पुष्पा 2 चित्रपटाचा टिझर 8 एप्रिल 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

<

 
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

खास म्हणजे येत्या 8 एप्रिल रोजी अर्जुनचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे निमित्त साधूनच अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाचा टीझर रिलीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुनने दिलेल्या या बातमीमुळे प्रेक्षकांची टीझर पाहण्यासाठी उत्सुकता आणखीन वाढली आहे. दरम्यान, पहिल्या पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानिया मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. तसेच यातील सर्वच गाणी हिट झाली होती. त्यानंतर आता अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी येत्या 8 एप्रिल रोजी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.