आता स्वस्तात मिळणार 5G मोबाईल; लाँच झाला नवा प्रोसेसर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण एखादा मोबाईल खरेदी करतो तेव्हा त्यामध्ये २ प्रकारचे प्रोसेसर पाहायला मिळतात. एक म्हणजे MediaTek आणि दुसरा म्हणजे Qualcomm प्रोसेसर…. यातील Qualcomm हा सर्वात मुरलेला प्रोसेसर आहे. मात्र मागील काही दिवसांपासून MediaTek ने वेगवेगळे प्रोसेसर मार्केट मध्ये लाँच करत Qualcomm समोर आव्हान निर्माण केलंय. अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी सुद्धा आपल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek चे प्रोसेसर वापरण्यास सुरुवात केल्याने Qualcomm चा बाजारच अडचणीत आला. मात्र आता Qualcomm ने स्वस्तात मस्त असा नवा प्रोसेसर लाँच करत पुन्हा एकदा मार्केटमध्ये मुसंडी मारण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.

Snapdragon 4s Gen 2 असं Qualcomm च्या या नव्याने लाँच झालेल्या प्रोसेसरच नाव असून गेल्या वर्षी आलेल्या स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चे स्वस्त व्हर्जन आहे. Qualcomm चा हा प्रोसेसर खास करून एंट्री-लेव्हल 5G उपकरांसाठी वापरण्यात येणार आहे. एका रिपोर्टनुसार, Snapdragon 4s Gen 2 या वर्षाच्या अखेरच्या काळात शिपिंग सुरू होईल. हा प्रोसेसर सुमारे $100 म्हणजेच 8,375 रुपये किमतीच्या उपकरणांमध्ये दिले जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, Qualcomm Snapdragon 4s Gen 2 चा वापर करणारा Xiaomi हा भारतीय बाजारातील पहिला ब्रँड असून शकतो. म्हणजेच देशातील ग्राहकांना आता स्वस्तात आणि कमी किमतीत 5G मोबाईल खरेदी करता येईल.

काय आहे खास?

Snapdragon 4s Gen 2 हा प्रोसेसर Samsung 4nm 4LPX प्रोसेस टेक्‍नॉलजीवर तयार करण्यात आला आहे. हा प्रोसेसर 1Gbps 5G स्पीड क्षमतेचा मोबाईल बनवतो, म्हणजेच इतका वेगवान डाउनलोड स्पीड उपलब्ध आहे. त्यामुळे तुमची सर्व कामे अगदी जलद पद्धतीने होतील. Qualcomm चा हा नवा प्रोसेसर 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह फुल HD प्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो. या प्रोसेसरनुसार, फास्ट चार्जिंग सुद्धा मोबाईल मध्ये मिळेल. कॅमेरा सपोर्टबद्दल बोलायचे झाले तर Qualcomm Snapdragon 4s Gen 2 सह मोबाईल मध्ये 16 MP + 16 MP ड्युअल कॅमेरे बसवले जाऊ शकतात. हा प्रोसेसर जास्तीत जास्त 108 MP फोटो कॅप्चर करू शकतो. महत्वाची बाब म्हणजे या नव्या प्रोसेसरमुळे 5G मोबाईलच्या किमती कमी होण्याची शक्यता असून मोबाईल खरेदीदार ग्राहकांसाठी हि मोठी आनंदाची गोष्ट आहे.