वर्ल्ड कपपूर्वी संघाला मोठा धक्का!! डावखुरा सलामीवीर क्रिकेटमधून निवृत्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दक्षिणआफ्रिकेचा तडफदार यष्टीरक्षक आणि डावखुला सलामीवीर क्विंटन डी कॉक ने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये होणाऱ्या ICC विश्वचषक स्पर्धेनंतर Quinton de cock एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्त होईल. Quinton de cock ने ह्याआधीच 2021 मध्ये टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता एकदिवसीय क्रिकेट सुद्धा त्याने निवृत्ती घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

T-20 क्रिकेट मध्ये असणार सहभागी :

एकदिवसीय क्रिकेट व टेस्ट क्रिकेट मधून क्विंटन डी कॉकने निवृत्ती घेतलेली असली तरी तो साऊथ आफ्रिकासाठी T -20 क्रिकेट मॅच मध्ये खेळतांना दिसेल. T-20 क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा कुठलाही विचार त्याने मांडला नाही. त्यामुळे येत्या काळात T-20 च्या मर्यादित क्रिकेट मॅच साठी क्विंटन डी कॉक खेळताना दिसेल.

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक एनोक एनक्वे म्हणाले, “आम्ही एकदिवसीय क्रिकेटमधून माघार घेण्याचा त्याचा निर्णय समजून घेतो आणि गेल्या अनेक वर्षांच्या सेवेबद्दल आम्ही त्याचे आभार मानू इच्छितो.आम्ही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो पण तरीही त्याचे T-20 क्रिकेट साठी त्याला प्रतिनिधित्व करताना पाहण्यास उत्सुक आहोत असं त्यांनी म्हंटल.

अशी आहे कारकीर्द :

30 वर्षीय Quinton de cock ने 2013 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या आजपर्यतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 140 एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी 54 कसोटी आणि 80 टी-20 सामने खेळले आहेत. क्विंटन डी कॉकने 140 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5966 धावा केल्या आहेत. या काळात क्विंटन डी कॉकची सरासरी ४४.८६ आणि स्ट्राइक रेट ९६.०९ होता. तसेच, क्विंटन डी कॉकने एकदिवसीय क्रिकेट मध्ये 17 शतके झळकावली आहेत. याशिवाय 29 अर्धशतके सुद्धा त्याने ठोकली आहेत.