रोहित शर्मा स्वच्छ मनाचा आणि महान व्यक्ती; अश्विनने ‘तो’ भावनिक क्षण सांगत केलं तोंडभरून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) तोंडभरून कौतुक केलं आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान पार पडलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, अश्विनच्या आईला चक्कर आली आणि त्याला तातडीने चेन्नईला जावं लागलं होत, त्यावेळचा संपूर्ण क्षण सांगत अश्विनने रोहित शर्मामधील माणुसकी जगासमोर आणली. कोणाचा तरी खूप विचार करणं, त्याच्या समस्या समजून घेणं आणि मग त्याची काळजी घेणं, रोहितनं खूप काही केलं. या स्वार्थी जगात अशी व्यक्ती मिळणे फार कठीण आहे असं म्हणत अश्विननं रोहित बद्दलच्या आपल्या भावना युट्युब चॅनेलवर व्यक्त केल्या.

अश्विन नेमक काय म्हणाला??

अश्विन म्हणाला, राजकोटमधील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मी पत्नीला विचारले की आई कशी आहे? ती शुद्धीत नाही का? तेव्हा डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितले की ती पाहण्याच्या स्थितीत नाही. त्यानंतर मी रडू लागलो. मी विमान शोधत होतो.” मला कोणताही फ्लॅट सापडला नाही. राजकोट विमानतळ संध्याकाळी 6 वाजता बंद होते, मला काय करावे हे समजत नव्हते. त्याचवेळी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड माझ्या रूम मध्ये आले. तेव्हा रोहितने मला कसलाही विचार न करता चेन्नईला जाण्याला सांगितलं. रोहित माझ्यासाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होता.

त्यावेळी मी जर कर्णधार असतो तर खेळाडूला म्हंटल असत घरी जा.. पण रोहितने जे केलं ते पूर्णपणे वेगळं होते. रोहितने कोणाला तरी माझ्यासोबत घरी येण्यास सांगितले आणि संपूर्ण प्रवासादरम्यान माझ्यासोबत असलेली व्यक्ती माझी काळजी घेत होती, मला काय हवं काय नको ते पाहत होती. हे अविश्वसनीय होते असं अश्विनने सांगितलं. “टीम फिजिओ कमलेश माझा खूप चांगला मित्र आहे. रोहितने त्याला माझ्यासोबत चेन्नईला जाण्यास सांगितले आणि माझ्यासोबत राहण्यास सांगितले, पण मी त्याला तिथेच राहण्यास सांगितले. मात्र नंतर मी खाली गेलो तेव्हा सुरक्षा आणि कमलेश तिथे आधीच होते. त्यानंतर विमानतळाच्या दिशेने प्रवास करत असताना, कमलेशला रोहितचा फोन आला, त्याने माझ्या तब्येतीची विचारपूस केली आणि या कठीण काळात त्याला माझ्यासोबत राहण्यास सांगितले. त्या दिवशी मला रोहित शर्मामध्ये महान कर्णधार दिसला असं अश्विनने म्हंटल.

मी गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे, पण रोहितमध्ये काहीतरी वेगळे आहे. रोहितचे मन स्वच्छ आहे, त्यामुळेच तो धोनीच्या बरोबरीने आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकू शकला आहे. कारण इतकं मोठेपण देव सहजपणे कोणाला देत नाही. सध्याच्या या स्वार्थी जगात रोहित शर्मा सारखी व्यक्ती मिळणे फार कठीण आहे.कोणाचा तरी खूप विचार करणं, त्याच्या समस्या समजून घेणं आणि मग त्याची काळजी घेणं, रोहितनं खूप काही केलं.
रोहित बद्दल माझ्या मनात असलेला आदर आणखी वाढला आहे. जर धोनी असता तर त्यानेही असं केलं असत, पण रोहित १० पाऊले पुढे गेला असेही अश्विनने सांगितलं.