Monday, January 30, 2023

राज्याची घडी पुन्हा बसवायची आहे, घर फोडायला वेळ नाही; विखे पाटलांची टीका

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकोंमकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यानंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil ) यांनी रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांना खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले विखे पाटील?
रोहित पवार यांनी हे वक्तव्य प्रसिद्धीसाठी केलं आहे. तसेच त्यांचे घर फोडायला इथे कुणालाही वेळ नाही. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचं जे काही नुकसान झालं आहे, ते आम्हाला भरून काढायचं आहे. आम्हाला राज्याची घरी पुन्हा बसवायची आहे. त्यामुळे आम्हाला कोणाचे घर फोडायला वेळ नसल्याचं म्हणत त्यांनी (radhakrishna vikhe patil ) रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

धनंजय मुंडेंनी साधला भाजपवर निशाणा
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी भाजपला टोला लगावला आहे. देशभरात जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत, त्या सर्वांचे अस्तित्व भाजपाला मिटवायचे आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष फोडण्यासाठी भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील. तरी देखील राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय