काँग्रेसला मोठा झटका!! राहुल गांधींची खासदारकी रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यामुळे आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी आडनावावरून जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी निरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी अशी नाव घेत सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात असा सवाल केला होता. राहुल यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवत २ वर्षांची शिक्षा ठोठावली.