राहुल गांधींना लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे? स्वतःच सांगितली ‘ही’ अट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमांतून जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आवडीनिवडी बाबत मनमोकळे पणाने भाष्य केलं आहे. यावेळी तुम्ही लग्न कधी करणार आणि तुम्हाला पत्नी कशी मुलगी पाहिजे असा सवाल केला असता त्यांनी त्यावरही उत्तर देत आपली मन की बात सांगितली आहे.

मला योग्य मुलगी मिळाली की मी लग्न करेन असे राहुल गांधींनी म्हंटल. परंतु मुलगी हुशार आणि बुद्धिमान असावी असेही ते म्हणाले. माझ्या आई-वडिलांचे लग्न अप्रतिम होते आणि त्यामुळे माझेही लग्नाबद्दलचे विचार खूप उच्च आहेत. मलाही स्वतःसाठी असाच जीवनसाथी हवा आहे असं राहुल गांधींनी सांगितलं.

खाण्याबाबत काय आवडत असा प्रश्न यावेळी विचारला असता राहुल गांधी म्हणाले, मी सर्व काही खातो . त्यांना चिकन टिक्का, सीख कबाब आणि उत्तम ऑम्लेट आवडतात. तसेच ते नियंत्रित आहारावर फोकस करतात मात्र त्यांना फणस आणि वाटाणा आवडत नाही. राहुल गांधी म्हणतात जेव्हा ते घरी असतात तेव्हा खाण्याबाबत एकदम दक्ष राहतात. परंतु इथे भारत जोडो यात्रेत मात्र ते काय असेल ते खातात.