नरेंद्र मोदी म्हणजे घाबरलेला हुकूमशाह; केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना ईडीने काल रात्री अटक (Arvind kejriwal Arrested) केली. निवडणुकीच्या तोंडावरच एका मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशातील INDIA आघाडीतील विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) याना लक्ष्य करत मोदींना घाबरलेला हुकूमशहा असं म्हंटल आहे. तर सरकार कडून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करण्यात येत आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत म्हंटल, घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे. प्रसारमाध्यमांसह सर्व संस्था ताब्यात घेणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून पैसे उकळणे, प्रमुख विरोधी पक्षाचे खाते गोठवणे या ‘असुरी शक्ती’साठी पुरेसे नव्हते, तर आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेचे प्रकारही साधी गोष्ट झाली आहे. INDIA याला चोख प्रत्युत्तर देईल असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केजरीवाल यांच्या अटकेवरून मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. देशात सार्वत्रिक निवडणुका होत असताना विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा सूडात्मक गैरवापर करण्यात येत असून याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भाजप सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात ‘INDIA ‘ एकजुटीने उभा आहे असं म्हणत शरद पवार यांनी केजरीवाल याना पाठिंबा दिला.