राहुल गांधींचे भर पावसात तुफान भाषण; देशवासीयांची जिंकली मने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर असून सध्या त्यांची ही यात्रा भाजपशासित कर्नाटकात आली आहे. गेल्या ३ दिवसापासून राहुल गांधी कर्नाटकात आहेत. याच दरम्यान, म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर त्यांनी भर पावसात भाषण करत उपस्थितांची आणि संपूर्ण देशवासीयांची मने जिंकली आहेत.

राहुल गांधी यांनी स्वतः या पावसातील भाषणाचा विडिओ ट्विट करत म्हंटल आहे कि, भारताला एकत्र करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज बुलंद करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जाणाऱ्या भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही असं म्हणत राहुल गांधीनी आपले इरादे स्पष्ट केले.

आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकता कि, सभेला संभोधित करताना राहुल गांधी म्हणत आहेत. भारत जोडो यात्रेचा प्रवास कन्याकुमारी ते काश्मीर असा होईल. यामध्ये तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. फक्त प्रेम आणि बंधुभाव दिसतील. हा प्रवास थांबणार नाही. आता बघा, पाऊस येतोय, पावसाने अजून प्रवास थांबवला नाही. गर्मी आणि तुफान या यात्रेला थांबवू शकत नाही. देशात द्वेष पसरवणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या विरोधात उभे राहणे हाच या यात्रेचा उद्देश आहे असेही राहुल गांधींनी म्हंटल.