राहुल गांधी, तुमचीच आज्जीसारखीच अवस्था होईल; कोणी दिली धमकी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘शीख’ समुदायाशी संबंधित वक्तव्यावरून देशाच्या राजकारणात गदारोळ उडाला आहे. भारतातील शीख समुदायामध्ये चिंता आहे की त्यांना पगडी आणि ब्रेसलेट घालण्याची परवानगी दिली जाईल की नाही? असं विधान राहुल गांधी यांनी केलं होते. तात्यांच्या या विधानानंतर शीख समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून याच पार्श्वभूमीवर भाजप समर्थित शीख सेलने बुधवारी (11 सप्टेंबर) दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या निदर्शनादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह (Tarvinder Singh) यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. राहुल गांधी, तुमचीच आज्जीसारखीच अवस्था होईल असं तरविंदर सिंग यांनी म्हंटल. त्यांचा एक व्हिडिओ काँग्रेसने शेअर करत कारवाईची मागणी केली आहे.

काय म्हणाले तरविंदर सिंह?

या निदर्शनावेळी तरविंदर सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हंटल की, राहुल गांधी, थांबा, नाहीतर भविष्यात तुमचीही आजीसारखीच अवस्था होईल.’ राहुल गांधींनी अमेरिकेत भारत आणि शीखांचा अपमान केला आहे. परदेशी भूमीवर त्यांनी आपल्या देशाची बदनामी केली. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी सुद्धा शीख सेलने यावेळी केली.

तरविंदर सिंह यांचा हा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. ‘ भाजपचा हा नेता उघडपणे विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे, नरेंद्र मोदीजी, तुमच्या पक्षाच्या या नेत्याच्या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही’, ही अत्यंत गंभीर बाब आहे. तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या कारखान्याची ही निर्मिती आहे. यावर कारवाई करावी लागेल. अशी पोस्ट करत काँग्रेसने कारवाईची मागणी केली.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील कार्यक्रमावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही. एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वारात जाऊ शकते की नाही. यासाठी लढाई आहे आणि ही केवळ शीख समाजासाठी लढाई नाही तर सर्व धर्मांसाठी आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.