अखेर राहूल गांधींची घर शोधण्याची वणवण थांबली; माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी भाड्याने राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. परिणामी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. यामुळे राहूल गांधी यांना त्यांचे राहते सरकारी घर देखील सोडावे लागले. तेव्हापासून ते १० जनपथ या निवासस्थानी राहत होते.या काळात राहून गांधी आपल्या स्वतंत्र्य घराच्या शोधात होते. मात्र आता त्यांचा हा शोध थांबला आहे. कारण की, राहूल गांधी यांनी दिल्लीचे माजी खा. संदीप दीक्षित यांचे घर भाड्याने घेतले आहे. निजामुद्दीन पूर्व भागातील १५०० चौरस फुटांचे, प्रशस्त हॉल, किचन, अंगन, बेडरुम असे हे भले मोठे घर आहे.

राहूल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांना देखील घर आवडल्यामुळे त्यांनी ते भाड्याने घेतले आहे. यापूर्वी या घरात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित राहत होत्या. त्यांच्या निधनानंतर संदीप दीक्षित या घरात राहत होते. आता मात्र हे घर राहूल गांधींच्या ताब्यात आले आहे. यापूर्वी संदीप दीक्षित यांनी राहूल गांधींना म्हटले होते की, मी घर बदलत असल्यामुळे तुम्ही या घरात राहू शकता. मात्र भाडेकरार केल्यानंतरच मी राहिला येईल असे राहूल गांधींनी दीक्षित यांना सांगितले. आता हा भाडेकरार पूर्ण झाल्यामुळे लवकरच राहूल गांधी याठिकाणी राहिला जाणार आहेत.

दरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कस असा सवाल करत मोदी आडनावाची बदनामी करणे राहूल गांधींना चांगलेच महागात पडले आहे. यामुळे त्यांना गुजरात कोर्टाने शिक्षा सुनावल्याने राहुल गांधींना आपली खासदारकी आणि आपले राहते घर सोडावे लागले. आता मात्र राहूल गांधी यांना एक प्रशस्त घर मिळाले आहे. बी-२ निजामुद्दीन हा राहूल गांधी यांच्या नवीन घराचा पत्ता राहणार आहे.