Tuesday, June 6, 2023

राहुल गांधींचा Truck मधून प्रवास, चालकांच्या समस्या घेतल्या जाणून; Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या वेगळ्याच फॉर्मात आहेत. कर्नाटकातील विजयाने त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. कधी कधी ते रस्त्यावर चालताना दिसतात तर कधी कधी ते अगदी थेटपणे लोकांच्यात मिसळतात. आता तर त्यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते ट्रक मधुन फिरताना दिसत आहेत.

त्याच झालं असे कि, राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला रवाना होत असताना वाटेत अंबाला ते चंदिगड असा ट्रकने प्रवास केला. त्यावेळी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राहुल गांधी ट्रकमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोमवारी रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल यांनी अंबाला येथे ट्रक चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाहनचालकांच्या समस्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी राहुल यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हंटल, राहुल गांधी विद्यापीठातील विद्यार्थी, खेळाडू, नागरी सेवेची तयारी करणारे तरुण, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमधील सामान्य नागरिक आणि आता मध्यरात्री ट्रकचालकांना का भेटत आहेत? कारण त्यांना या देशातील लोकांचे ऐकायचे आहे, त्यांची आव्हाने आणि समस्या समजून घ्यायच्या आहेत. त्यांना हे करताना पाहून एक विश्वास दिसून येतो, कोणीतरी आहे जो लोकांच्या पाठीशी उभा आहे, कोणीतरी आहे जो त्यांच्या उद्याच्या चांगल्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहे. कोणीतरी आहे जो द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडत आहे.