राहुल गांधींची शिवगिरी मठाला भेट; श्री नारायण गुरूंना वाहिली आदरांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. आज राहुल गांधी यांनी केरळ येथील शिवगिरी मठाला भेट दिली. प्रख्यात समाजसुधारक श्री नारायण गुरु यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुल गांधी या मठात पोचले. यावेळी त्यांनी येथील संन्याशांचीही भेट घेतली आहे.

शिवगिरी मठात जाऊन महान अध्यात्मिक, तत्वज्ञानी आणि समाजसुधारक श्री नारायण गुरु यांना आदरांजली वाहिली. श्री नारायण गुरूंनी लोकांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम घेतले आणि महात्मा गांधींसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर त्यांचा प्रभाव पडला असे राहुल गांधी यांनी म्हंटल.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या विरोधात भारत एकत्र करण्याच्या उद्देशाने भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसची हि यात्रा कन्याकुमारी पासून सुरु झाली असून ती काश्मीर पर्यंत जाणार आहे. 150 दिवसांत 3,570 किलोमीटरचा प्रवास करून राहुल गांधी जम्मू काश्मीरला जातील. देशातील 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतुन ही भारत जोडो यात्रा जाईल.