प्रवाशांना खुशखबर ; नांदेड-पटना दरम्यान विशेष गाडीची घोषणा

0
436
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात , त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने (Indian Railways) नांदेड ते पटनादरम्यान एक विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सोय व्हावी म्हणून ही विशेष गाडी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर चला या विशेष गाडी बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

विशेष गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग –

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07099 नांदेड-पटना विशेष गाडी 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 वाजता नांदेड येथून सुटेल आणि 15 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता पटना रेल्वे स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 07100 पटना-नांदेड ( Patna – Nanded ) विशेष गाडी 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता पटना येथून सुटेल आणि 17 फेब्रुवारीला पहाटे 4.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.

प्रमुख स्थानकावर थांबणार –

हि विशेष गाडी प्रमुख स्थानकावर थांबणार आहे. त्यामध्ये पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर या स्थानकांचा समावेश असणार आहे.

कुंभमेळ्यासाठी भाविकांना मोठा दिलासा –

उत्तर प्रदेशातील (UP) प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. या पवित्र सोहळ्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांचीही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या विशेष गाडीची घोषणा करून भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार असून कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच विशेष गाडीमध्ये 22 डबे असतील, त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.