Railway coolie : मागच्या पाच वर्षांपासून इंधन , तेल , रोजच्या लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र मागच्या पाच वर्षात कुलींच्या मजुरी दरात मात्र कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे अनेक दिवसांपासून कुलींच्या दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी होती. ही मागणी अखेर पूर्ण करण्यात आली असून रेल्वे बोर्डाने आता त्यांच्या मजुरीत देखील वाढ केली आहे. एवढेच नाही तर त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांसारख्या (Railway coolie) अनेक प्रकारच्या सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. तब्बल पाच वर्षांनी कुलींच्या दर वाढविण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कुली रेल्वे स्थंकावर महत्वाची भूमिका बजावतात. प्रवाशांच्या सामानासह मालाची वाहतूक करण्यासाठी कुलीना प्राधान्य दिले जाते. कुलींच्या दरात वाढ करण्याची मागणी अखेर मान्य केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशभरातील सर्व ६८ विभागांमध्ये अंमलबजावणी
रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , जवळपास पाच वर्षांनंतर सामान (Railway coolie) घेऊन जाणाऱ्या कुलींचे दर वाढवण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर रायपूर विभागात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. देशभरातील सर्व ६८ विभागांमध्ये याची अंमलबजावणी करावी, असे मंडळाने म्हटले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना कुली दरांचे पुनरावलोकन आणि व्यवस्थापन करण्याचे अधिकार असतील.
हे नवीन दर आहेत (Railway coolie)
- ४० किलोपेक्षा जास्त वजन असल्यास रेल्वे प्रवाशाला २४० रुपयांऐवजी आता २५० रुपये मोजावे लागणार आहेत.
- वृद्ध किंवा आजारी व्यक्तीला व्हील चेअरवर आणण्यासाठी १३० रुपयांऐवजी १८० रुपये मोजावे लागतील.
- आजारी व्यक्तीला स्ट्रेचरवर नेण्यासाठी २०० रुपयांऐवजी २७० रुपये मोजावे लागतील.
- कुलींच्या मजुरीचे नवे दर देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर (A1 आणि A श्रेणी) लागू होतील.
- त्याच वेळी, लहान रेल्वे स्थानकांवर दर थोडे कमी असतील.
- रेल्वे प्रवासी निश्चित दरापेक्षा जास्त पैसे मागितल्यास स्टेशन मास्टरकडे तक्रार करू शकतील.
कुलींना मिळणार ही सुविधा (Railway coolie)
- रेल्वे बोर्डाने सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक वर्षांपूर्वी कुलींना मोफत वैद्यकीय उपचार, शिक्षण, रेल्वे पास आदी सुविधा सुरू केल्या होत्या.
- कुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे रुग्णालयात मोफत प्रवास करता येणार आहे.
- यामध्ये पंतप्रधान आयुष्मान भारत योजना कार्डधारकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
- याशिवाय पोर्टर्सना दरवर्षी तीन लाल शर्ट आणि एक उबदार शर्ट दिला जातो.
- याव्यतिरिक्त, त्यांना दरवर्षी एक पास आणि प्रिव्हिलेज तिकीट (Railway coolie) ऑर्डर (PTO) दिला जाईल.
- स्थानकांवर पोर्टर्सना स्वत:हून विश्रामगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये टीव्ही, आरओ पाणी आणि बेड इत्यादी आवश्यक सुविधा असतील.
- कुलींच्या मुलांना रेल्वे शाळेत मोफत शिक्षणाची सोय आहे.