हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Railway Employees Insurance Scheme । देशातील तमाम रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची भरपाई देणारी योजना सुरू केली आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी कर्मचाऱ्यांना कोणताही प्रिमिअम भरावा लागणार नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
रेल्वेने मोरादाबाद विभागातील लोको पायलट सुशील लाल यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचा पहिला विमा (Railway Employees Insurance Scheme) जनादेश दिला आहे. बडोदा हाऊस येथील उत्तर रेल्वे मुख्यालयात मृत कर्मचाऱ्याच्या पत्नी प्रिया सिंग यांना उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक वर्मा, रेल्वे अधिकारी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. ज्यामुळे सुशील लाल यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुशील यांच्या पत्नी प्रियाने सांगितले की त्यांना ८ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे पती रेल्वेमध्ये लोको पायलट होते. ते त्यांचे कर्तव्य पूर्ण करून ट्रेनमधून उतरत होते. या दरम्यान ते पडले. ११ मार्च रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
ही योजना कशी काम करते? Railway Employees Insurance Scheme
कर्मचाऱ्यांना कोणताही प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही.
कर्मचाऱ्यांनी त्यांचे पगार खाते “पगार पॅकेज खाते” म्हणून नोंदणीकृत केले पाहिजे.
त्यानुसार, भारतीय रेल्वेशी भागीदारी केलेल्या बँका अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई देतात.
रेल्वे कर्मचारी, कामावर असो, ड्युटीबाहेर किंवा कामाच्या ठिकाणी बाहेर कुठेही असला तरी त्यांना अपघाती मृत्यू विमा मिळेल.
परंतु तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी त्यांचे पगार खाते भागीदार बँकेसोबत पगार पॅकेज खात्यात रूपांतरित केले आहे याची खात्री केली जाईल.
या योजनेअंतर्गत (Railway Employees Insurance Scheme) जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना कव्हर मिळावे हे रेल्वे विभागाचे उद्दिष्ट आहे. हि योजना रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवते आणि रेल्वे विभाग आपल्या कामगारांसोबत उभी आहे हे सुद्धा यातून स्पष्ट होते.




