Railway News : महत्वाची बातमी ! कोल्हापूर-सातारा दरम्यान 28 अनारक्षित विशेष गाड्या धावणार ; पहा वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway News : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसतो आहे. त्यातही कोल्हापूर सातारा पुणे या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. म्हणूनच या भागातील पूरस्थिती लक्षात घेता मध्य रेल्वेने कोल्हापूर ते सातारा दरम्यान 14 अनारक्षित विशेष गाड्या आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही (Railway News) गाड्यांना तात्पुरते थांबे देखील देण्यात आले आहेत.

कोल्हापूर-सातारा पट्ट्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे 28 अनारक्षित विशेष गाड्या – कोल्हापूर ते सातारा दरम्यान 14 स्पेशल आणि 14 स्पेशल कोल्हापूर ते मिरज दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी (Railway News) करण्यासाठी चालवणार आहे.

कोल्हापूर- सातारा अनारक्षित विशेष (14 सेवा)

गाडी क्रमांक 01412 अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून 07.08.2024 ते 13.08.2024 पर्यंत दररोज 08.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.25 वाजता सातारा येथे पोहोचेल.गाडी क्रमांक 01411 अनारक्षित विशेष सातारा येथून 07.08.2024 ते 13.08.2024 पर्यंत दररोज 14.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 18.35 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल. या गाडीला 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 5 स्लीपर क्लास आणि 7 सामान्य द्वितीय श्रेणीचे (Railway News) डब्बे असतील.

कुठे घेईल थांबे ? (Railway News)

वळिवडे, रुकडी, हातकणगले, जयसिंगपूर, मिरज, विश्रामबाग, सांगली, नांद्रे, भिलावडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, भवानी नगर, शेणोली, कराड, शिरवडे, मसूर, तारगाव, रहिमतपूर आणि कोरेगाव

कोल्हापूर- मिरज अनारक्षित स्पेशल (14 सेवा)

गाडी क्रमांक 01416 अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून 07.08.2024 ते 13.08.2024 पर्यंत दररोज 20.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 21.25 वाजता मिरजला पोहोचेल.गाडी क्रमांक ०१४१५ अनारक्षित स्पेशल मिरज येथून 07.08.2024 ते 13.08.2024 पर्यंत दररोज ०६.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.०५ वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल. या गाडीला 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 5 स्लीपर क्लास आणि 7 सामान्य द्वितीय श्रेणी चे डब्बे (Railway News) असतील.

कुठे घेईल थांबे ? (Railway News)

वळिवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर