Railway News : देशभरात रेल्वेचे सक्षम जाळे प्रवाशांसाठी वरदान ठरते आहे. भारत देशाचं लाईफलाईन असलेली ही रेल्वे आता आधीक आधुनिक आणि अधिक सुलभ झाली आहे. डेक्कन एक्सप्रेस, वंदे भरात एक्सप्रेस यासारख्या सुखसोयींनीयुक्त रेल्वेसोबतच काही मार्गांवर नवीन रेल्वे स्थानके सुद्धा विकसित करण्यात येत आहेत. जेणेकरून रेल्वेचे हे जाळे अधिक मजबूत होईल. मुंबई च्या बाबतीत बोलायचे झाले तर रेल्वे (Railway News) ही दळणवळणाच्या साधनांमध्ये मुख्य भूमिका बजावते. केवळ मुंबईच नव्हेतर आसपासच्या भागांना देखील ही रेल्वे मुंबईशी जोडते. आता रेल्वेची कनेक्टिव्हिटी अधिक वाढवण्यासाठी ठाणे – मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे.
या रेल्वे स्थाकामुळे घोडबंदर रोड, वागले एस्टेट आणि पोखरण येथील रहिवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. एलिव्हेटेड रस्त्यांच्या साहाय्याने तीन हात नाक्यापासून केवळ पाचच मिनिटांत हे स्टेशन गाठता येणार आहे. नव्या स्टेशन मुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. हा प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला 2 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या स्थानकावर (Railway News) तीन प्लॅटफॉर्म तयार होणार आहेत आणि एक होम प्लॅटफॉर्म राहणार आहे. या स्थानकात प्रवाशांसाठी तीन पादचारी पूल तयार केले जाणार आहेत.
गुरुवारी या रेल्वे स्टेशनच्या (Railway News) भागाची पाहणी खासदार राजन विचारे यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमंशी संवाद साधला. यावेळी बोलताना विचारे म्हणाले की, नवीन स्टेशन हे तीन हात नाका पासून पाच मिनिटांच्या अंतरावर असेल याची काळजी घेतली जाईल जेणेकरून रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल आणि प्रवाशांचा वेळही वाचेल. हा नवा प्रोजेक्ट 2025 डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती विचारे यांनी यावेळी सांगितली.
2000 साली मांडण्यात आला होता प्रस्ताव
या मार्गाचा प्रस्ताव 2000 साली मांडण्यात आला होता. कारण ठाणे रेल्वे स्टेशनवर (Railway News) प्रवाशांची मोठी गर्दी होते ती कमी करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. ठाणे रेल्वे स्टेशनवर दररोज जवळपास सात लाख प्रवाशांचे गर्दी असते. त्यानंतर या योजनेला स्मार्ट सिटी योजनेमध्ये समाविष्ट केले गेले आणि केंद्र सरकारकडून 259 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला गेला. ज्याला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली. त्यानंतर या प्रोजेक्टसाठी बरेच अडथळे निर्माण झाले ज्यामध्ये या प्रोजेक्टला कोर्टाकडून स्टे सुद्धा मिळाला होता. या स्टेला 2023 मध्ये हटवण्यात आले. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन (Railway News) तयार होण्यासाठी मार्ग मोकळा झाला.