Railway News : मागच्या काही दिवसांपासून वाहतूक सेवा मजबूत करण्याकडे सरकारचा कल वाढलेला दिसून येत आहे.राज्यात रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहेत. शिवाय ‘वंदे भारत’ सारख्या पूर्ण स्वदेशी बनावटीच्या ट्रेन्स सह ज्या भागात अद्याप रेल्वे मार्ग जोडले गेले नाहीत तिथे रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुद्धा सुरु आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत असाच प्रस्तावित असलेला (Railway News) एक रेल्वे मार्ग म्हणजे वर्धा ते नांदेड रेल्वे मार्ग आता या मार्गाबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे चला जाणून घेऊया..
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा ते नांदेड दरम्यान सुरू असणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम आता 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा मार्ग यवतमाळ मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे.खरंतर या रेल्वे मार्गामुळे (Railway News) मराठवाडा आणि विदर्भातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे मराठवाड्यातला जनतेला विदर्भ आणि विदर्भातलया जनतेला मराठवाड्यात येणं सोपं होणार असून जलद गतीने (Railway News) हे आंतर पार येणार आहे. मात्र हा रेल्वे मार्ग केव्हा सुरू होईल याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र याबाबत आता एक मोठी अपडेट हाती आली असून मध्य रेल्वेचे महाप्रबंधक रामकरण यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत सर्वांत सामान्यांसाठी खुला होणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक झाली होती या बैठकीमध्ये वर्धा यवतमाळ आणि नांदेड या रेल्वे लाईन (Railway News) संदर्भात बराच वेळ चर्चा झाली संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा काम संपुष्टात आलं असून रेल्वे मार्गाची मातीकरण व अस्तरीकरण करण्याचं काम वेगानं सुरू आहे. सध्या वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वे मार्ग पूर्णत्वास आला आहे अशी माहितीही देण्यात आली आहे.