Railway News : यापूर्वी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आरक्षणाशिवाय प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र आता या प्रवाशांना आरक्षणाशिवाय सहज प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने नवीन गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे, या सर्व गाड्या 20 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून धावणार आहेत, ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असेल, त्या मार्गांवरच या गाड्या (Railway News) चालवल्या जातील असे सांगण्यात येत आहे.
या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना स्थानकावरील तिकीट काउंटरवरून सामान्य तिकिटे खरेदी करावी लागतील. तसेच, ते UTS ॲपद्वारे तिकीट बुक करू शकतील. या गाड्यांमध्ये सामान्य श्रेणी आणि आसन श्रेणीचे डबे असतील. IRCTC च्या 10 नवीन गाड्या देशातील प्रमुख शहरांना जोडतील.
किती आहे तिकीट ?
अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता यावा यासाठी या गाड्यांचे भाडे सामान्य गाड्यांच्या तुलनेत खूपच कमी ठेवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये जनरल डब्याचे भाडे 150 रुपये आणि सीटिंग साठी 300 रुपये ठेवण्यात आले आहे.
- कसे असेल वेळापत्रक ?
मुंबई-पुणे सुपरफास्ट
प्रस्थान: मुंबई, सकाळी 7:30
पोहोच: पुणे, सकाळी 11:00
हैदराबाद-विजयवाडा एक्सप्रेस
प्रस्थान: हैदराबाद, सकाळी 7:30
पोहोच: विजयवाडा, दुपारी 2:00
दिल्ली-जयपूर एक्सप्रेस
प्रस्थान: दिल्ली, सकाळी 6:00
पोहोच: जयपूर, दुपारी 1:30
लखनऊ-वाराणसी एक्सप्रेस
प्रस्थान: लखनऊ, सकाळी 7:00
पोहोच: वाराणसी, दुपारी 1:30
कोलकाता-पटना इंटरसिटी
प्रस्थान: कोलकाता, सकाळी 5:00
पोहोच: पटना, दुपारी 2:00
अहमदाबाद-सूरत फास्ट
प्रस्थान: अहमदाबाद, सकाळी 7:00
पोहोच: सूरत, दुपारी 12:30
पटना-गया एक्सप्रेस
प्रस्थान: पटना, सकाळी 6:00
पोहोच: गया, सकाळी 9:30
जयपूर-अजमेर फास्ट
प्रस्थान: जयपूर, सकाळी 8:00
पोहोच: अजमेर, सकाळी 11:30
चेन्नई-बेंगलुरू एक्सप्रेस
प्रस्थान: चेन्नई, सकाळी 8:00
पोहोच: बेंगलुरू, दुपारी 3:30
भोपाल-इंदौर इंटरसिटी
प्रस्थान: भोपाल, सकाळी 6:30
पोहोच: इंदौर, दुपारी 12:00




