Railway News : सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरु आहे. या काळात पर्यटनासाठी तसेच गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वेला पाहायला मिळते. अशातच जर तुम्ही पुणे, अहमदनगर मार्गावरून रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता. रेल्वेकडून या मार्गावर विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा (Railway News) निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्या , निवडणूक लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम सुरु आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मनाला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा सण अवघ्या दोनच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुणे , अहमदनगर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी (Railway News) आता आनंदाची बातमी आहे तुम्ही तुमच्या कामानिमित्त जर या मर्गावरून प्रवास करणार असाल तर रेल्वेकडून विशेष गाडीची सोय करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया…
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता पुणे ते मुजफ्फरपुर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे -मुजफ्फरपुर अशा 9 गाड्या आणि मुजफ्फरपुर- पुणे अशा 9 म्हणजेच या मार्गावर एकूण 18 गाड्या सोडण्यात (Railway News) येणार असल्याची माहिती आहे.
‘या’ स्थानकांवर असतील थांबे (Railway News)
ही समर स्पेशल ट्रेन या मार्गावरील हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या राज्यातील सात महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.
काय आहे वेळापत्रक ?
पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष रेल्वे (ट्रेन क्रमांक 05290) ही गाडी 6 मे ते 1 जुलै या कालावधीत चालवली जाणार आहे.या कालावधीत ही गाडी दर सोमवारी पुणे रेल्वे स्टेशन वरून सकाळी 6. 30 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी (Railway News) मुझफ्फरपूरला दुपारी 3. 15 वाजता पोहोचणार आहे.
मुझफ्फरपूर – पुणे सुपरफास्ट एसी विशेष रेल्वे (गाडी क्रमांक 05289) ही ट्रेन 4 मे ते 29 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.या कालावधीत ही गाडी प्रत्येक शनिवारी मुझफ्फरपूर येथून रात्री सव्वा नऊ वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 5.35 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सणासुदीच्या काळात आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठा (Railway News) फायदा होणार आहे.