रेल्वे ट्रॅकवर हाय होल्टेज ड्रामा ! ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेला तरुण थोडक्यात बचावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । रेल्वे पोलिस जीआरपीच्या जवानांनी मंगळवारी मध्यप्रदेशातील डाब्रा रेल्वे स्थानकातील ट्रॅकवर ओव्हरहेड वायर मध्ये अडकलेल्या एका युवकाची सुटका केल्याची घटना घडली. बचावकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी या मार्गावर वीज बंद केली. त्यामुळं हा तरुण थोडक्यात बचावला आहे.

घटनेच्या व्हिडिओ मध्ये हे पाहता येईल की रेल्वेच्या इंजिनवर असलेल्या ओव्हरहेड वायरला एक तरुण चिकटला होता. हि गोष्ट येथील पोलिस अधिकारी यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि ओव्हरहेड वायरला चिकटलेल्या त्या तरुणाला  त्यांनी जबरदस्तीने  खाली खेचले आणि त्याला सोडवले.काही अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत येथील वीज पुरवठा बंद केला. त्यामुळं त्या तरुणांची लवकर सुटका होऊ शकली.

हा हाय होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र हा तरुण रेल्वे इंजिनवर का चढला होता. याची माहिती अजून समजू शकली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस घेत आहेत.