रेल्वे विभागात नोकरीची संधी; 100 हुन अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway Recruitment 2023 । रेल्वे विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल इंडीया टेक्निकल एंड इकोनॉमिक सर्व्हीस राईट्सने (RITES) विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना येत्या 7 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पदासाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार rites.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच इतर माहिती जाणून घ्यायची असल्यास देखील rites.com वर जाऊन ती मिळवू शकतात.

रिक्त पदे आणि स्वरूप

राईट्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, सिव्हील इंजिनिअर, पर्यावरण सामाजिक निरीक्षण तज्ज्ञ, ज्युनिअर डीझाईन इंजिनिअर, ड्राफ्टसमनसह इतर पदांसाठी 111 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया एक वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर असणार आहे. परंतु उत्तम कामगिरी दाखविल्यास उमेदवाराची मुदतवाढ ही करण्यात येईल.

पात्रता आणि शिक्षण- 

पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 40 वर्षांहून कमी असायला हवे. आरक्षण असणाऱ्या उमेदवारांना वयामध्ये विशेष सूट देण्यात आले आहे. तसेच या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त महाविद्यालयातील संबंधित क्षेत्रातील डीग्री असावी. तसेच त्याच्याकडे चार ते पाच वर्षांचा अनुभव आणि पदाविषयी इतर माहिती असावी.

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया

पदासाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट rites.com वर जावे.
त्यानंतर होमपेजवर करीयरच्या टॅबवर क्लीक करावे.
तिथून पुढे, करियर अंतर्गत ऑनलाईन नोंदणीकरण भागावर क्लिक करावे.
यानंतर पायरी क्र. 1 नोंदणीची लिंक भरावी आणि लॉगिन करावे.
पुढे, वॅकेन्सी नंबरवर क्लिक करून समोर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये सर्व योग्य ती माहिती भरावी.
संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करावा आणि त्याची एक प्रत आपल्याजवळ काढून ठेवावी.