Railway Recruitment 2024 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 5969 पदांसाठी बंपर भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway Recruitment 2024 । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत तब्बल 5969 पदांसाठी बंपर भरती जाहीर झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. आजपासून म्हणजेच २० जानेवारी पासून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. १९ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.

काय आहे पात्रता –

ITI डिप्लोमा केलेला कोणताही विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराचे वय हे कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ३० वर्ष असावे. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सवलत देण्यात येईल.

निवड कशी होईल? Railway Recruitment 2024

कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -१ (CBT)

कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -२ (CBT)

कम्प्यूटर बेस्ड एप्टीट्यूड टेस्ट (CBAT)

डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन

मेडिकल टेस्ट

फी किती –

या भरतीसाठी (Railway Recruitment 2024) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज करणाऱ्या SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये फी भरावी लागेल.

अर्ज कुठे करावा –

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IndianRailways.gov.in अधिकृत साइटला भेट द्यावी