भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज सुमारे 2.5 कोटीहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली. त्यानंतर भारतीय रेल्वेने प्रचंड विकास केला असून आज 68,000 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रेल्वे मार्गावर दररोज हजारो गाड्या धावत असतात. प्रवास सोयीस्कर आणि परवडणारा असल्यामुळे बहुतेक प्रवासी ट्रेनलाच प्राधान्य देतात. मात्र, रेल्वे प्रवाशांसाठी वेळोवेळी नवे नियम लागू करत असते. रेल्वेच्या नव्या नियमानुसार, वेटिंग तिकीट घेऊन आरक्षित डब्यात चढल्यास प्रवाशांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
वेटिंग तिकीट घेऊन प्रवास केल्यास काय होईल?
स्लीपर कोच: जर तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन स्लीपर कोचमध्ये चढलात, तर तुम्हाला 250 रुपये दंड आणि तुम्ही ज्या स्टेशनवरून प्रवास सुरू केला तेथून टीटीईने पकडलेल्या स्टेशनपर्यंतचा तिकीट भाडा द्यावा लागेल. जर तुम्हाला पुढील प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी स्वतंत्र तिकीट काढावे लागेल.
एसी कोच: जर तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन एसी कोचमध्ये चढलात, तर तुम्हाला 440 रुपये दंड आणि प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असलेले तिकीट भाडे भरावे लागेल.
ऑनलाइन आणि काउंटर तिकीटचे नियम वेगळे
ऑनलाइन वेटिंग तिकीट: जर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक केले असेल आणि ते वेटिंगवर राहिले, तर ते स्वयंचलितपणे रद्द होईल आणि तुमच्या खात्यात परतावा (Refund) मिळेल.
काउंटर वेटिंग तिकीट: काउंटरवरून खरेदी केलेले वेटिंग तिकीट रद्द केले जात नाही आणि तुम्हाला त्यावर प्रवास करण्यास परवानगी दिली जात नाही.
रेल्वेचा नियम मोडल्यास मोठे परिणाम
रेल्वेच्या नियमांचा भंग करणे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे प्रवाशांनी वेटिंग तिकीटवर प्रवास करण्याऐवजी कन्फर्म तिकीट घेण्याचा प्रयत्न करावा. रेल्वेने प्रवास सुरक्षित आणि नियमानुसारच करा अन्यथा दंडाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा