हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे उत्तम साधन मानले जाते. रेल्वेचा प्रवास हा आरामदायी आणि कमी पैशात होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशी रेल्वेला पसंती दाखवतात. महत्वाची बाब म्हणजे रेल्वेचं जाळे हे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले असल्याने लांबच्या प्रवासासाठी रेल्वे हाच बेस्ट पर्याय ठरतो. तुम्हीही सतत रेल्वेने प्रवास करत असाल तर मित्रानो, हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने मुलांच्या तिकिट बुकिंग नियमांमध्ये (Railway Tickets New Rule) महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, रेल्वेने ५ वर्षांखालील मुलांसाठी मोफत प्रवास सुरू केला आहे, तर ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी विशेष भाडे नियम लागू केले आहेत. हे बदल तात्काळ लागू झाले आहेत
काय आहे नेमका नियम ? Railway Tickets New Rule
रेल्वे विभागाच्या नवीन नियमांनुसार, ५ वर्षांखालील मुले तिकिटशिवाय प्रवास करू शकतात, जर त्यांना स्वतंत्र सीट किंवा बर्थची आवश्यकता नसेल तर. कारण अशा परिस्थितीत, पालक मुलाला त्यांच्या मांडीवर घेऊन मोफत प्रवास करू शकतात. परंत्तू , जर मुलासाठी स्वतंत्र बर्थ किंवा सीट बुक केली असेल तर, प्रौढांसाठी पूर्ण भाडे अनिवार्य असेल. भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मुलांसाठी तिकीट बुकिंगशी (Railway Tickets New Rule) संबंधित नियमांमध्ये हा बदल केला आहे. या नियमामुळे प्रवासी पालकांचा अनावश्यक खर्च वाचण्यास मदत होईल.
दुसरीकडे ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष भाडे लागू केलं आहे. जर या वयोगटातील मुलाला सीट किंवा बर्थची आवश्यकता नसेल आणि तिकीट बुकिंग दरम्यान ‘नो सीट/नो बर्थ (NOSB)’ पर्याय निवडला गेला तर मुलाचे तिकीट अर्ध्या भाड्याने उपलब्ध असेल. परंतु , जर मुलासाठी सीट किंवा बर्थ बुक केली असेल तर पूर्ण प्रौढ भाडे म्हणून गृहीत धरले जाईल. याशिवाय रेल्वेने हे देखील स्पष्ट केले आहे की 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना प्रौढ मानले जाईल आणि त्यांच्या तिकिटावर सामान्य दराने भाडे भरावे लागेल. त्यांना तिकीट दरात कोणतीही सूट मिळणार नाही.




