झारखंडमध्ये बॉम्बने उडवला रेल्वे ट्रॅक ; कारस्थानाच्या मागे कोणाचा हात ?

jharkhand
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मागच्या काही दिवसांपासून रेल्वे ट्रॅक वर दगड , मोठे खांब अशा वस्तू ठेवल्याच्या अनेक घटना देशभरातून उघडकीस येत आहेत. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही अशी घटना घडली होती. मात्र आता झारखंड मधून एक धक्कादायक बातमी हाती येत आहे. झारखंड मधील रांची येथील साहिबगंज मध्ये बॉम्बस्फोट घऊन आणून रेल्वे ट्रॅक उडवून दिल्याची घटना घडली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराहट निर्माण झाली आहे.

अन रेल्वे ट्रॅकचा भाग उडून पडला

लालमाटिया ते फरक्का या एमजीआर रेल्वे मार्गावर ही घटना घडली. अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत ट्रॅकचा 470 सेमी लांबीचा तुकडा खराब झाला आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की रेल्वे ट्रॅकचा काही भाग 39 मीटर अंतरावर पडला.

ट्रॅकमध्ये 770 सेमीचा गॅप

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर ट्रॅकमध्ये 770 सेंटीमीटर अंतर निर्माण झाले आहे. तेथे तीन फूट खोल खड्डा आहे. 40/1 क्रमांकाच्या पिलरजवळ हा स्फोट झाला. खांब क्रमांक 39/15 येथे ट्रॅकचा तुकडा सापडला. आतापर्यंत केलेल्या तपासात हा स्फोट का झाला हे समोर आलेले नाही. अपघातानंतर झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात आहे की कोणीतरी जाणूनबुजून रेल्वे रुळाचे नुकसान केले आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.