‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ अशी ख्याती असलेल्या काश्मीरला खास वंदे भारत एक्सप्रेसने भेट देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. खरेतर भारतीय रेल्वे काश्मीरसाठी विशेष वंदे भारत ट्रेन (दिल्ली ते श्रीनगर वंदे भारत) तयार करत आहे. ही ट्रेन श्रीनगर आणि नवी दिल्लीला जोडेल आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवर धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यात या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवू शकतात.
खास हीटिंग फीचर्स
ET च्या रिपोर्टनुसार, या वंदे भारतमध्ये खास हीटिंग फीचर्स असतील. ही ट्रेन खास अशा भागांसाठी तयार करण्यात आली आहे जिथे तापमान शून्य अंशापर्यंत पोहोचते. या गाड्यांमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये सिलिकॉन हीटिंग पॅडची सुविधा असेल. याशिवाय, पाणी गोठण्यापासून रोखण्यासाठी प्लंबिंगसाठी सेल्फ-रेग्युलेटिंग हीटिंग केबलची सुविधा देखील असेल.
नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत मार्ग
नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत अंबाला कँट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा, सांगलदान आणि बनिहालसह काही प्रमुख स्थानकांवर थांबेल. काश्मीरच्या उंच टेकड्या आणि जगातील सर्वात उंच पूल पार करून काश्मीरच्या सुंदर खोऱ्यात प्रवेश करणारी ही ट्रेन 800 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे.
नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत भाडे
हा प्रवास 13 तासात पूर्ण होईल. प्रवाशी संध्याकाळी 7:00 वाजता दिल्लीच्या ट्रेनमध्ये चढतील आणि सकाळी 8:00 वाजता श्रीनगरला पोहोचतील. विशेष वंदे भारत मध्ये 3 श्रेणी असतील – AC प्रथम श्रेणी, AC 2 टियर आणि AC 3 टियर. त्याचे भाडे 2,000 ते 3,000 रुपये असू शकते.