ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या माध्यमातून रेल्वेने कमावले 54 हजार कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेव्हापासून भारतात डिजीटलाईझेशन आले आहे. तेव्हापासून प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मिळणं सोपं झालं आहे. मग ती छोटयातली छोटी वस्तू का असेना ऑनलाईन मिळतेच. रेल्वेने प्रवास करणारे सुद्धा अनेकदा ऑनलाईन तिकीट आधीच मोबाईलच्या माध्यमातून बुक करत असतात. या ऑनलाईन तिकीट बुकींचे प्रमाण इतकं वाढलं आहे कि, भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या सहाय्याने 54 हजार कोटी रुपये कमवले आहे. 2014 मध्ये व्यापक ऑनलाइन वापर आणि डिजिटायझेशनसाठी केलेल्या प्रयत्नानंतर, 2014 ते 2023 पर्यंत ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये विक्रमी वाढ झाली असून ई- तिकीट महसूलातही वाढ झाली आहे.

2022-23 मध्ये 4,313 लाख ई-तिकीटे झाली होती बुक

रेल्वेचे ऑनलाईन तिकीट अनेकजण काढतात. त्यामध्ये फक्त २०२२-२३ मध्ये या आर्थिक वर्षात एकूण 7,706 लाख प्रवाशांकडून 4,313 लाख ई-तिकीटे बुक करण्यात आली होती. जी मागील वर्षी म्हणजेच २०२१-२२ मध्ये 4,174 लाख होती. ही वाढ झाल्यामुळे रेल्वेच्या महसूलातही वाढ झाली आहे.

2014-15 मध्ये 20,621 कोटी

2014 साली ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. त्या एका वर्षात ऑनलाईन बुकिंगची संख्या ही 20,621 कोटी एवढी होती. ती हीच संख्या 22-23 मध्ये तब्ब्ल 54,313 कोटीवर येऊन पोहचली. त्यामुळे ही लक्षनीय वाढ म्हणता येईल. मात्र कोविड च्या काळात या संख्येवर परिणाम होऊन 17,762 कोटी रुपयापर्यंत आकडा घसरला होता.

12 नोव्हेंबर 2022 रोजी एका मिनिटात 28,434 बुकिंग

IRCTC या भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग अँपने ई – तिकीट बुकिंग मध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. प्रत्येक मिनिटाला 26,000 पेक्षा जास्त ई-तिकीट बुकिंग करण्यास सक्षम असलेल्या NGet प्रणालीने 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका मिनिटात तब्बल 28,434 तिकिटांचे रेकॉर्डब्रेक बुकिंग करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे या बुकिंग वाढीचे श्रेयही यालाच जाते.

निमलष्करी दलासाठीही रेल्वेची ही सेवा

भारतीय रेल्वे प्रत्येकासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे ही सेवा प्रत्येकासाठी खुली करण्यात आली आहे. ज्यामध्ये निमलष्करी दलाचाही समावेश आहे. IRCTC मार्फत NSG, CRPF, NDRF, AR, CISF, BSF, आणि ITBP या दलासाठीही ही सेवा उल्पब्ध आहे. त्यामुळे 22-23 मध्ये CRPF ने 6,24,345 ई-तिकीट बुकिंग केले आहे. तर BSF ने 1,72,631 ई-तिकीट बुकिंग केले. रेल्वेच्या या सेवामुळे तिच्या महसुलात लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे.