Railways Insurance : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवासाचे साधन म्हणून रेल्वेला मोठी पसंती आहे. म्हणूनच देशभरात लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वे विभागाकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक योजना चालवल्या जातात. याच योजनांपैकी एक महत्वाची योजना म्हणजे रेल्वेचा विमा. खरंच रेल्वे विभागकडून केवळ 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा मिळतो ? चला जाणून घेउया…
खरंतर रेल्वे प्रवास विम्याचा लाभ फक्त त्या प्रवाशांनाच मिळतो ज्यांनी तिकीट खरेदी करताना विमा घेतला आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. महत्वाचं म्हणजे रेल्वे प्रवास विमा अशा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे जे ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करतात. तिकीट काउंटरवरून तिकीट बुक केल्यास रेल्वे प्रवास विमा उपलब्ध नाही. तसेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही ही सुविधा मिळत (Railways Insurance) नाही. हा विमा ऐच्छिक आहे. म्हणजे घ्यायचे की नाही हे प्रवाशांवर अवलंबून असते.
10 लाखांचे विमा संरक्षण (Railways Insurance)
रेल्वे प्रवास विम्याच्या बाबतीत, विमा कंपनी रेल्वे अपघातात प्रवाशाने झालेल्या नुकसानीची भरपाई करते. रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते.एखादा रेल्वे प्रवासी अपघातात पूर्णपणे अपंग झाला तरी कंपनी त्याला 10 लाख रुपये देते. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपयांची विमा रक्कम उपलब्ध आहे. त्याच वेळी, दुखापत झाल्यास, उपचार खर्चासाठी 2 लाख रुपये दिले (Railways Insurance) जातात.
कसा मिळवाल विमा ?
- जेव्हा ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग केले जाते, तेव्हा वेबसाइट आणि ॲपवर रेल्वे प्रवास विम्याचा पर्याय असतो. तिकीट बुक करताना (Railways Insurance) विम्याचा पर्याय नक्की निवडा.
- विम्यासाठी तुमच्याकडून फक्त 45 पैसे आकारले जातील.
- विमा पर्याय निवडल्यावर, तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक लिंक पाठवली जाईल.
- ही लिंक विमा कंपनीची असते.
- या लिंकवर जा आणि तेथे नॉमिनी तपशील भरा.
- विमा पॉलिसीमध्ये नॉमिनी असल्यास विमा क्लेम (Railways Insurance) मिळवणे सोपे होते.