सणासुदीच्या काळात रेल्वे चालवणार 6,000 विशेष गाड्या : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सध्या दाणासुदीचा हंगाम जवळ येत आहे. येत्या 3 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आहे. तर त्यानंतर लगेचच वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी सुद्धा येतो आहे. या काळात कामानिमित्त्त बाहेरगावी वसलेले अनेक लोक आपल्या घरी जात असतात. त्यापैकी बहुतांश लोक रेल्वेचे बुकिंग करतात. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता यंदा जवळपास 6,000 विशेष गाड्या चालवण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.

सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना, भारतीय रेल्वेने दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ सणांसाठी एक कोटीहून अधिक प्रवाशांना घरी पोहोचवण्यासाठी जवळपास 6,000 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “ 6,000 विशेष गाड्या तर आहेतच याशिवाय, 108 गाड्यांना अतिरिक्त सामान्य डबे जोडण्यात आले आहेत आणि सणांच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन 12,500 डबे मंजूर करण्यात आले आहेत,” असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अनेक रेल्वे मार्ग, विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसाठी ठरलेल्या मार्गांवर दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ सणांमध्ये प्रचंड गर्दी असते.

पुढे बोलताना वैष्णव म्हणाले की, यंदाच्या सणाच्या हंगामासाठी आतापर्यंत एकूण 5,975 विशेष गाड्या अधिसूचित करण्यात आल्या आहेत, गेल्या वर्षी 4,429 गाड्या होत्या. “यामुळे या पूजेच्या गर्दीत एक कोटीहून अधिकप्रवाशांना घरी जाण्याची सोय होईल,” ते म्हणाले. 9 ऑक्टोबरपासून दुर्गापूजा सुरू होईल, दिवाळी 31 ऑक्टोबरला साजरी होईल, तर छठ पूजा 7 आणि 8 नोव्हेंबरला होणार आहे.