हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rainy Vegetables) आपल्या आहारात आपण काय खातो? याचा आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आहार तज्ञ सांगतात की, आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आहारात समावेश करा. यामुळे सुदृढ शरीर आणि निरोगी आरोग्य मिळेल. पण बिघडती जीवनशैली आपल्या दैनंदिन आहारावर परिणाम करते. अनेकदा आपण आपल्या शरीराला हानी पोहचेल अशा पदार्थांचे सेवन करतो. ज्यामुळे कित्येक आजारांना आपणहून आमंत्रण मिळते. मग दवाखाना मागे लागतो आणि कडू औषधे, इंजेक्शन, काही गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया देखील करावी लागते. या सगळ्यांपासून आपले संरक्षण व्हावे असे वाटत असेल तर आपल्या आहारात रानभाज्यांचा समावेश करा.
पावसाळ्याच्या दिवसात बाजारात हमखास उपलब्ध असणाऱ्या काही रानभाज्यांची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Rainy Vegetables) ज्या औषधांपेक्षा जालीम आणि गुणकारी आहेत. या भाज्यांचे सेवन केल्यास कोणतेही आजार होत नाहीत. अनेक गंभीर रोगांवर या भाज्यांचे सेवन प्रभावी ठरते. चला तर जाणून घेऊया.
1. गुळवेल
गुळवेल ही भाजी झाडांवर किंवा कुंपणावर वाढते. या भाजीला अमृतवेल किंवा अमृतवल्ली म्हणून सुद्धा ओळखतात. मधुमेह, कावीळ, सर्दी, खोकला, ताप अशा अनेक आजारांवर ही भाजी गुणकारी आहे. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते. (Rainy Vegetables)
2. कंटोळा
कंटोळा ही एक अशी रानभाजी आहे जी डोंगराळ भागात आढळते. याला काही भागात ‘कंटोळी’सुद्धा म्हणतात. ही रानभाजी दिसायला काटेरी आणि आकाराने खूप लहान असते. (Rainy Vegetables) मात्र, या भाजीचे आयुर्वेदिक गुण अनेक समस्यांवर प्रभावीपणे काम करतात. या भाजीचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळते. शिवाय या भाजीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मधुमेहींसाठी ही भाजी ववरदान ठरते.
3. टाकळा (Rainy Vegetables)
पावसाळ्याच्या दिवसात हमखास बाजारात आढळणारी भाजी म्हणजे टाकळा. ही भाजी पडीक किंवा ओसाड जमिनीत उगवते. काहीशी गुळगुळीत अशी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. यामध्ये इसब, अॅलर्जी, सोरायसिस, खरूज यासारख्या त्वचा विकारांपासून सुटका देणारे घटक आहेत. शिवाय पोटात कृमी होणे, ताप येणे, हृदय विकार, श्वसन मार्गात अडथळा यांवर देखील ही भाजी प्रभावी ठरते.
4. आघाडा
आघाडा ही रानभाजी ओसाड जमिनीवर किंवा जंगलात वाढते. या भाजीची पाने, फळे आणि मुळे अत्यंत गुणकारी असतात. ही भाजी खाल्ल्याने लघवी साफ होते आणि किडनी स्टोनचा धोका टळतो. (Rainy Vegetables) शिवाय वात, हृद्यरोग, मूळव्याध या आजारांवरदेखील ही गुणकारी आहे.
5. काटेमाठ
काटेमाठ ही एक रानभाजी आहे. जी पावसाळ्यात ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेला वाढते. बाळंतिणीच्या आहारात ही भाजी असल्यास अंगावर दूध वाढते. तसेच गर्भपात होण्याचा धोका टळतो आणि गर्भाचे नीट पोषण होते. (Rainy Vegetables) याशिवाय पित्त, मूळव्याध, रक्तविकार यावर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते.