…म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढण्याची हिंमतच होत नाही; राज ठाकरेंनी सांगितलं नेमकं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अथांग’ वेब सीरिजचा लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी मनोरंजन सृष्टीश अनेक गोष्टींवर आपले परखड मत व्यक्त केले. मलाही छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढायचा आहे. पण आता इतके चित्रपट येऊन गेलेत की त्यांच्यावर चित्रपट काढण्याची माझी हिंमतच होत नाही”, असे राज ठाकरे यांनी म्हंटले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “मी राजकारणामध्ये खूप अपघाताने आलो. माझं पाहिलं पॅशन हे फिल्म मेकिंग (चित्रपट निर्मिती) हे आहे. त्यामुळे ज्यावेळी मी एखादा चित्रपट पाहतो त्यावेळी तो चित्रपट मी त्या दृष्टिकोनातून पाहतो. मी बरेचसे मराठी चित्रपट पाहत असताना मला खूप घाईगडबडीत केल्यासारखे वाटतात”. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढायचा आहे. पण आता इतके चित्रपट येऊन गेलेत की माझी हिंमतच होत नाही.

कॉलेजमध्ये असताना मी ‘गांधी’ चित्रपट पाहायचो. तेव्हा मला वाटायचं की छत्रपती शिवाजीमहाराजांवर इतका मोठा चित्रपट बनवला गेला पाहिजे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट काढण्याच्या तयारीत मी आहे. माझं काम सुरू आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा काढणार असून तो तीन भागांत प्रदर्शित करण्यात येईल, असे ठाकरे यांनी म्हंटले.