मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार? मोजक्या शब्दात राज ठाकरेंनी दिले प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आता वंचित बहुजन आघाडी (VBA) पक्षाचा समावेश महाविकास आघाडीत करण्यात आला आहे. त्यामुळेच पुढे जाऊन तुमचा पक्ष ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरेंनी रोखठोक उत्तर दिले आहे. तसेच, यांच्या महाविकास आघडीकडे कोण जाणार? असा उलट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीकडे कोण जाणार?

नुकताच वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. यावर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “आताचे लवंडे कुठे जातील याचा पत्ता नाही. यांच्या महाविकास आघाडीकडे कोण जाणार? यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? INDIA आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले?” अशा मोजक्या शब्दात मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचा राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले.

पुढे बोलताना, “लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. शिर्डी, नगरचे पदाधिकारी येऊन गेले. पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय” अशी माहिती देखील राज ठाकरेंनी यावेळी दिली.

दरम्यान, ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचा एकमतावर वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीमध्ये करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही बैठका त्यांचा महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे.