PFI वरील बंदीनंतर राज ठाकरेंकडून अमित शहांचे अभिनंदन; म्हणाले की अशी कीड…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारने ५ वर्षाची बंदी घातल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. अशी कीड तात्काळ समूळ नष्ट करायला हवी असं मत त्यांनी मांडलं.

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटल कि, PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन. ..

पीएफआय वर नेमकी बंदी का??

पीएफआयचे आयएसआयएसशी संबंध असल्याचे केंद्र सरकारने म्हंटल आहे.

पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटना बेकायदेशीर कारवाया करत होत्या. या कारवाया देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी धोकादायक आहेत.

पीएफआय कडून देशातील अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षितते विरुद्ध कृती केली जात आहे अस केंद्र सरकार म्हणते.

विशिष्ट समुदायाला कट्टरतावादी करण्याचा गुप्त अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप