महिला दिनानिमित्त मनसेची स्त्रियांना मोठी ऑफर; राज ठाकरे म्हणाले, महिलांनो ….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन… यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पत्र लिहीत राज्यातील सर्व महिलांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी महिलाना राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे.

राज ठाकरेंचं पत्र जसच्या तस –

आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे, ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्तानं सहज स्थिरावत आहेत. जिथं जातील तिथं स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

100, 150 वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता, अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे. म्हणूनच स्त्रियांनी आता राजकारणात (Politics) देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं असं राज ठाकरेंनी म्हंटल.

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच, विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी महिलाना राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे.