Tuesday, January 31, 2023

राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र म्हणजे स्क्रिप्टचा भाग; राऊतांच्या दाव्याने खळबळ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लिहिले होते. त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागेही घेतला. यांनतर अनेकांनी भाजपच्या भूमिकेचं स्वागत केलं असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र हा एक स्क्रिप्टचा भाग आहे असं म्हणत खळबळ उडवून दिली आहे.

पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यासाठी ते सत्र न्यायालयात आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या पत्रावर भाष्य करताना हा एक स्क्रिप्टचा भाग होता. खरं तर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपनं सर्वे केला होता. त्यावेळी ही निवडणूक ठाकरे गट मोठ्या फरकाने जिंकेल हे भाजपला समजलं होतं. त्यामुळे भाजपने आपला अर्ज मागे घेतला असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुक भाजपने लढवू नये असं पत्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहिलं होत. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते . त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,” अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली होती. अखेर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला. जेव्हा कधी एखाद्या आमदाराचे निधन होते आणि त्याजागी त्यांच्या पत्नी किंवा मुलगा उभा राहतो तेव्हा उमेदवार द्यायचा नाही ही आपली संस्कृती आहे असं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.