Thane Lok Sabha 2024 : राजन विचारेंनी ठाण्यात करून दाखवलं? एकनाथ शिंदेंचा मोठा गेम

rajan vichare naresh mhaske
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याचा (Thane Lok Sabha 2024) खासदार कोण? याचा निकाल आता इव्हीएममध्ये बंद झालाय. ठाकरेंचे एकनिष्ठ राजन विचारे (Rajan Vichare) विरुद्ध शिंदेंच्या राईट हॅण्ड समजल्या जाणाऱ्या नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्यातली ही काटे की टक्कर… एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण की मशाल याचं उत्तर 4 जूनला स्पष्ट होणारच आहे… पण मतदानाच्या दिवशीचं एकूण वातावरण पाहता आणि मतदानाच्या टक्केवारीचं डिकोडिंग केलं तर मतदान घासून झालं पण निकालात थोड्या फरकाने मशाल मैदान मारेल, असं चित्र सध्या दिसतंय. मतदानाच्या दिवशीचा संपूर्ण थरार आणि निकाल कुणाच्या बाजूने लागतोय. तेच तुम्हाला थेट सांगतोय.

ठाण्यात मतदानाच्या दिवशीही बराच ड्रामा पाहायला मिळाला. बोगस मतदानाच्या तक्रारी, ठराविक जातीच्या मतदारांची नावं मतदार यादीतून गायब होणं तर बऱ्याच ठिकाणी संथ झालेलं मतदान यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ दिवसभर चर्चेचा मुद्दा राहिला… मतदान पार पडल्यावर समोर आलेल्या आकडेवारी नुसार ठाण्यात पाच वाजेपर्यंत 45.38 टक्के इतक्या कमी मतदानाची नोंद झाली. त्यातही एरोलीमध्ये 42.66 टक्के अशी सर्वात कमी तर मुख्यमंत्री शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं. आता हा मतदानाचा आकडा नक्की कुणाच्या बाजूने शिफ्ट होऊ शकतो? याचं थोडं डिकोडींग करुयात…

पहिलं म्हणजे ठाण्याचा सेंटर पॉईंट असणाऱ्या ठाणे विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान होईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्ष मतदान खूपच कमी झालं. इथं धनुष्यबाणाचा जोर होता. पण मशालीलाही दिवसभर मिळालेला प्रतिसाद पाहता धनुष्यबाणाला इथं काठावरचं लीड मिळेल… ओवळा माजिवाडा मतदारसंघात प्रताप सरनाईक यांनी धनुष्यबाणाचे हात बळकट केले होते…पण नरेंद्र मेहता यांनी मशालीला दिलेला हात मजबूत असल्याने इथला निकालही बरोबरीत सुटेल, असं बोललं जातंय.. तिसरा आणि सर्वात इंटरेस्टिंग राहिला तो कोपडी पाचपाखाडी मतदारसंघ… शिंदे आमदार असलेल्या या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान झालं. शिंदेंनी इथं पूर्ण ताकद लावून मतदान आपल्या बाजूने खेचून आणलं असलं तरी इथला मशालीचा सायलंट व्होटर सर्वांनाच धक्का देऊ शकतो… बेलापूर मध्ये मंदा म्हात्रे यांनी धनुष्यबाणाचं काम केलं असलं तरी सुरुवातीपासून या भागात बघायला भेटणारी मशालीची सुप्त लाट लढत बरोबरीत सोडवेल, असं चित्र आहे… एरोलीत नाईक पिता पुत्रांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसल्याचं मतदानाच्या दिवशीही पाहायला मिळालं. त्यामुळेच इथला मतदानाचा टर्नओव्हर सर्वात कमी होता. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या मीरा-भाईंदर मध्ये धनुष्यबाण लीड मध्ये राहील. पण इथल्या मुस्लिम समाजाची मतं ही विचारेंच्या पाठीशी असल्यामुळे हा म्हस्केंसाठी मोठा सेटबॅक असणारय… ठाण्याच्या मतदानाप्रमाणे त्याचा निकालही घासून लागेल, असं एकूणच मतदानानंतरचं चित्रं आहे…

राजन विचारे यांनी शिवसेनेतील बंडाच्या वेळेस ठाकरेंशी निष्ठा दाखवून शिंदेंना मोठं आव्हान दिलं… महाविकास आघाडीने राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन प्रचाराच्या दोन तीन फेऱ्या पार पडल्या तरी शिंदेंकडून कोण? या नावाचं कन्फर्मेशन होत नव्हतं…पण शेवटी शिंदेंचे ठाण्यातील एकनिष्ठ नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली… पण प्रचारात उतरायला लागलेला टाईम, विचारेंनी आक्रमकपणे गद्दार विरुद्ध खुद्दार असा आक्रमक प्रचार करत खेचून आणलेली काठावरची मतं आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेत भाजपचा राहिलेला इनऍक्टिव्हनेसचा मोठा फटका नरेश म्हस्के यांना बसल्याची ग्राउंड मध्ये चर्चा आहे…

दुसरीकडे मशालीला जिंकवून देण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदार केंद्रात लांबच्या लांब रांगा लावल्याची चर्चाही झाली…एकूणच काय बारामतीतील अजित पवारांसारखं ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्यांविरोधातही जनतेच्या नाराजीचा सूर दिसला… या सहानुभूतीच्या कन्वर्जनचा फायदा मशालीला मोठ्या प्रमाणात झाल्याने ठाण्यात 4 जूनला निसटती का होईना, पण मशाल पेटणार… असं चित्र पाहायला मिळतंय. ठाण्यातून मशाल पेटणं म्हणजे बालेकिल्ल्यातूनच शिंदेंची नाचक्की असा एकंदरीत हा प्रकार असणार आहे… त्यामुळे ठाण्यात 4 जूनला कुणाच्या बाजूने निकाल लागणार? यासाठी दोन्ही गटांनी देव पाण्यात सोडलेत, असं म्हणायला हरकत नाही…मतदानानंतर ठाण्यात मशालच पटेल, असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..