व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली वृत्तसंस्था: दिवसेंदिवस देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. अशात केवळ सामान्य नागरिक नव्हे तर अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटिंना देखील कोरोनाने गाठले आहे. आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘ कोविड टेस्ट केल्यानंतर आज माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणत्याही प्रकारची लक्षणं नाहीत. मला ठीक वाटत आहे. कोरोना प्रोटोकॉलचे मी पालन करत आहे आणि आयसोलेशन मध्ये राहून मी माझे काम चालूच ठेवेन’ अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काहीजणांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे जाणवतात मात्र काही जणांना असिम्पटोमॅटिक म्हणजेच लक्षण नसलेले कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. अशातच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना देखील कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाही. मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

देशातील ताजी कोरोना आकडेवारी

दरम्यान देशात नवे तीन लाख 79 हजार 557 कोरोना बाधित रुग्ण एकाच दिवसात आढळले आहेत. तर मागील 24 तासात तब्बल 3,645 जणांचा कोरोनामुळे मुळे मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासात 2 लाख 69 हजार पाचशे सात जणांना कोरोनावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.