शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपासाठी ‘या’ राज्याची अनोखी योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांकडून खरीप हंगामामध्ये दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेची बियाणे व खते खरेदी केली जातात. बियाणे जर चांगली असतील तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे पेरणी करताना चांगले प्रमाणित बियाणांचा वापर करणे खूप महत्वाचे असते. शेतकऱ्यांना स्वस्तात आणि अनुदानावर बियाणे खरेदी करता यावीत म्हणून विविध राज्य सरकारकडून बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. यात आता राजस्थान सरकारकडून तर थेट शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना बियाणे दिली जात आहेत.

खरीप हंगामात बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ होते. बियाणे खरेदीस इतर शासकीय योजनाही त्यांच्या हितासाठी असतात. त्याबाबत माहिती मिळत नसेल तर चिंता करू नका हॅलो कृषी हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि शासकीय अनुदानाच्या योजनांविषयी माहिती घेऊ शकतात. शिवाय तुमच्या जवळच्या कृषी केंद्रांशीही संपर्क साधू शकता.

त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या खत दुकानदार, रोपवाटिका आणि कृषी केंद्रे यांची यादी दिसेल. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

Seeds 02

कशा प्रकारे केले जाते मोफत बियाणे वाटप

राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना मोफत बियाणे देता यावीत म्हणून राजस्थान सरकारने किसान साथी योजना आणि मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आणि शेतकरी गटांना मोफत बियाणे वितरित केले जातात. जेणेकरुन त्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकेल. मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, कृषी विभागाने 30 ते 50 शेतकऱ्यांचे गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेणेकरुन ते परस्पर सहकार्याने शेती करु शकतील. कृषी विभागावातील अधिकाऱ्यांकडून संबंधित गटातील शेतकऱ्यांची ओळख करून दिली जाते. त्यानंतर RSSC मार्फत मोफत बियाणांचे वाटप केले जाते. यानंतर शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते.

Seeds

खास योजनेअंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

राजस्थान सरकारच्यावतीने मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना 25 टक्के अनुदानावर बियाणांचा पुरवठा केला जातो. अनेकवेळा राजस्थान सरकार केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे मिनी किट पुरवते. या योजनांमध्ये राष्ट्रीय तेलबिया आणि तेल पाम मिशन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यांचाही समावेश आहे.

seed

कोणाला घेता लाभ?

राजस्थान सरकारकडून दिल्या जात असलेल्या मोफत बियाणे योजनेचा लाभ हा काही वर्गातील शेतकऱ्यांना बघता येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील SC, ST, अल्प आणि अत्यल्प, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकर्‍यांना प्राधान्याने बियाणांचे मिनी किट वितरित केले जाते. शेतकरी कुटुंबातील महिला सदस्याला राज्य सरकारकडून बियाणांचे स्वतंत्र मिनी किट देण्याची तरतूद आहे.