राजे प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करणार : छ. उदयनराजे भोसले

0
169
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | राजे प्रतिष्‍ठान ही सामाजिक संघटना गेल्या 12 ते 13 वर्षांपासून आमच्‍या नेत्तृत्‍वाखाली कार्यरत आहे. या संघटनेत नवीन तरुणांना संधी देण्यासाठी प्रतिष्‍ठानच्‍या कार्यकारिणीत संघटनात्‍मक बदल करण्‍यात येणार आहेत. बदल केलेली नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्‍यात येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्‍यावतीने पत्रकाव्‍दारे देण्‍यात आली आहे.

पत्रकात म्‍हटलं आहे की, समाजाशी एकरुप होवून, अन्‍यायाविरुध्‍द लढणाऱ्या तरुणांचे संघटन म्‍हणून राजे प्रतिष्‍ठान संपूर्ण राज्‍यात ओळखले जाते. आमच्या नेत्तृत्‍वाखाली प्रतिष्‍ठानच्‍यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. नोंदणीकृत असणारे हे प्रतिष्‍ठान आमच्या अध्यक्षतेखाली समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. प्रतिष्‍ठानच्‍या या कामाचा नुकताच आढावा घेण्‍यात आला.

यादरम्‍यान विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांच्‍या भावना जाणून घेण्‍यात आल्‍या. त्‍यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यकारणीवर समाज आणि सेवाकार्य करण्यासाठी नवीन चेह-यांना संधी देण्यात येईल. जुनी कार्यकारिणी बरखास्‍त करण्‍यात आली आहे. आगामी काळात नवीन युवकांना संधी देत प्रतिष्ठानच्‍या कार्यकारणीत जरुर ते बदल लवकरच करण्यात येणार आहेत. नव्‍या दमाचे चेहरे असणारी प्रतिष्‍ठानची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्‍यात येईल, असंही उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here