Monday, February 6, 2023

कोल्हापूर हादरलं! तरुणाची भर रस्त्यात सपासप वार करून हत्या

- Advertisement -

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 22 वर्षांच्या तरुणाची सपासप वार करून हत्या (died) करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कुमार शाहूराज गायकवाड असे हत्या (died) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो 22 वर्षांचा होता. मृत कुमारची टोळीयुद्धातून हत्या (died) करण्यात आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास कुमारचा पाठलाग करुन त्याची हत्या करण्यात आली. यावेळी त्याच्यावर तब्बल 20 वार करण्यात आले होते.

काय घडले नेमके?
कुमार गायकवाड हा तरुण आपल्या मामाकडे राहत होता. नुकताच कुमारचा राजेंद्र नगर परिसरात एका टोळीतील तरुणाशी वाद झाला होता. याच वादातून विरोधी टोळीतील तरुणांनी कुमारच्या हत्येचा (died) कट रचला. कुमार एका मॉलजवळ थांबला असता विरोधी टोळीतील काही तरुण त्या ठिकाणी आले. तेव्हा आपल्यावर हल्ला होण्याच्या भीतीने कुमारने घटनास्थळावरुन पळ काढला मात्र हल्लेखोरांनी कुमारचा पाठलाग करत त्याच्यावर सपासप वार करून त्याची हत्या केली. कुमारच्या चेहरा, हात, डोकं आणि छातीवर हल्लेखोरांनी सपासप वार केले.

- Advertisement -

बराच वेळ झाला कुमार घरी आला नाही म्हणून मामाने त्याला फोन केला. मात्र कुमारने तो फोन उचलला नाही. यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु करण्यात आली. यानंतर तो एके ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू (died) झाला होता. कुमार हा आपल्या मामाचा व्यवसाय सांभाळत होता. कुमारच्या हत्येनंतर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!