राजीव सातव यांचे खंदे समर्थक गंगाधर पाटील चाभरेकर शिवबंधनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड प्रतिनिधी। काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले राजीव सातव यांना मोठा धक्का बसलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघातून विधानसभेसाठी ईच्छुक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले.

चाभरेकर यांना काँग्रेस ने उमेदवारी नाकारली त्यामुळे चाभरेकर नाराज होते. सातव यांच्या सोबतच अशोक चव्हाण यांनी हदगाव मध्ये माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना दिल्याने याचा मोठा फटका बसणार आहे.

मतदार संघात चाभरेकर समर्थकांची मोठी फळी असून, आता याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना होणार आहे.चाभरेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे हदगाव मधील राजकीय गणित बदणार हे मात्र, निश्चित आहे.

इतर काही बातम्या-