Rajmarg Yatra app : आपण लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघत असताना अनेकदा खूप तयारी करून निघतो. पैसे, खाणे, इमर्जन्सीसाठी लागणाऱ्या गोष्टी अशा सर्व गोष्टींची बांधाबांध केलेली असते . याशिवाय गुगल मॅप ही असतोच की रस्ता सांगायला. मात्र अनेकदा अनोळखी जागेवरून किंवा राज्यातून प्रवास करीत असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे एक बॅकअप प्लॅन तयार ठेवावा लागतो. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच बॅकअप प्लॅन (Rajmarg Yatra app) बद्दल सांगणार आहोत जो तुम्हाला मदत करेल.
जेव्हा तुम्ही महामार्गावरून प्रवास कराल तेव्हा अनेकदा काही गोष्टींची आवश्यकता भासते. इंधन, इमरजन्सी सर्व्हिसेस, जवळपासचे हॉटेलस , दुर्गम भागात अनेकदा कुठे काय आहे हे सापडत नाही म्हणूनच National Highways Authority of India (NHAI) ने एक महत्वपूर्ण अँप लॉन्च केले आहे जे तुम्हाला प्रवासादरम्यान मदत करेल.
या अँपचे नाव आहे ‘Rajmarg Yatra app’ महामृगावरून प्रवास करताना हे अँप खूप फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या नजीकच्या टोल पासून हेल्पलाईन पर्यंत सर्व माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्ही फक्त अॅपस्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून ‘Rajmarg Yatra app हे अॅप डाऊनलोड करायचे आहे. त्याशिवाय दूरध्वनी क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही यावर लॉगईन करू शकता. अॅप सुरु केल्यानंतर तिथं तुम्हाला Highway Amenities सह इतरही पर्याय दिसतील. या पर्यायांची मदत तुम्ही घेऊ शकता.
या सुविधा मिळतील
- जवळपास असणारे पेट्रोल पंप
- जवळपास असणारे हॉटेल किंवा रेस्टोरंट
- जवळपास असणारे ATM
- जवळपास असणारी मेडिकल फॅसिलिटी
- Rajmarg Yatra app मुळं तुम्हाला Fastag recharge, total distance आणि weather report ची माहितीसुद्धा मिळणार आहे.
- अॅपमध्ये तुम्हाला Emergency helpline 1033 आणि पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 ची सुविधा देण्यात आली आहे.