संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर राजू शेट्टींनी दिली ही प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. राऊतांवरील कारवाईनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रातील पहिला माणूस मी आहे. जो ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असे बोलणारा. त्या मतावर मी आजही ठाम आहे, असे शेट्टी यांनी म्हंटले.

कराड तालुक्यातील खोडशी येथे शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठकीवेळी राजू शेट्टी यांनी हॅलो महाराष्ट्रशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष हे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोणत्याही पक्षाला राज्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही.

राज्यपालांच्या वक्तव्याला क्षमा नाहीच : राजू शेट्टी

महाराष्ट्र राज्याला मिळालेले राज्यपाल यांनी काल केलेले वक्तव्य हे दुर्दैवी आहे. राज्यपालांच्या वक्तव्याला क्षमा नाहीच, परंतु असला राज्यपाल महाराष्ट्राला मिळावा हेच मोठे दुर्दैव असल्याची खोचक टीका राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.