शिवसेनेकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्याला दिली मोठी संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मोठी संधी दिली आहे. शिवसेनेने (Shiv Sena) मिलिंद देवरा यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर

येत्या 2 एप्रिल रोजी राज्यसभेमध्ये असलेल्या सहा सदस्यांची मुदत संपणार आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन, खासदार अनिल देसाई, वंदना चव्हाण, कुमार केतकर यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवरच मार्च महिन्यात राज्यसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवराई यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळेच यावेळी शिवसेनेने मिलिंद देवरा यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातील एक मोठे नेतृत्व म्हणून मिलिंद देवरा यांना पाहिले जाते. त्यांनी सलग 2004 आणि 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत देखील ते बाजी मारतील असा विश्वास शिवसेनेकडून दाखवण्यात आला आहे.