Rajya Sabha Election 2024: महाराष्ट्रासह 15 राज्यांतील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्यसभेच्या 56 जागांच्या निवडणुकीचे (Rajya Sabha Election 2024) बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, येत्या 27 फेब्रुवारी रोजी या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीच्या अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी होणार असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

निवडणूक प्रक्रिया काय असेल?

निवडणूक आयोगाकडून नुकत्याच राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी पंधरा राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. कारण, एप्रिल 2024 मध्ये 56 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. या जागांसाठी निवडणुका मतदान 27 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान होईल.

निकाल कधी लागेल? (Rajya Sabha Election 2024)

27 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी निकाल देखील जाहीर करण्यात येईल. या निवडणुका संबंधित अधिसूचना 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोग जारी करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी ही नामांकनाची अंतिम तारीख राहील. 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येतील.

महाराष्ट्रात कोणते खासदार निवृत्त होणार?

भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर 2024 सालात निवृत्त होणार आहेत. तर देशातील 13 राज्यांमधील 50 खासदार याच दिवशी निवृत्त होतील. इतर दोन राज्यातील 6 खासदार तीन एप्रिलला निवृत्त होतील.