हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे बहीण- भावाच्या नात्याचा सण.. सर्वच बहिणी आज आपल्या भावाला राखी बांधतात आणि भाऊ सुद्धा त्या बदलयात बहिणीला ओवाळणी देतो…. हि आपली परंपरा आहे. आज सर्वत्र हा सण साजरा केला जात असताना पुण्यातील रिक्षा चालकांनी सुद्धा या खास दिवसाच्या निमित्ताने महिलांना १०० रुपयांपर्यंत मोफत प्रवास ( Auto Rikshaw Offer For Womens) देण्याची घोषणा करत एकप्रकारे ओवाळणीच दिली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी अनेक बहिणी भावाला राखी बांधण्यासाठी एसटी बस, टॅक्सी आणि रिक्षाने जात असतात. त्यामुळेच बहिणांना १०० रुपयांपर्यंत मोफत प्रवास देण्याचा निर्णय पुण्यातील रिक्षाचालकांनी घेतला आहे.
आज सोमवारी ( दि. १९) ऑगस्टला सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथ (Pune Station Rikshaw Mitra Prepaid Booth) वरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना १०० रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिला जात असून त्यापुढे भाडे झाल्यास एकूण भाड्यातून रू. १०० ची सूट देण्यात येणार आली आहे. याठिकाणी शहरातील आतापर्यत ८०० रिक्षा पुणे स्टेशन वरील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर नोंदणी केली आहे. या सर्व रिक्षातून महिलाना फायदा मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी हि एकप्रकारे चांगली ओवाळणीच म्हणावी लागेल.
यावेळी रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी म्हंटल कि, रिक्षाचालक बांधवा तर्फे महिला प्रवाशांना रक्षाबंधनाची छोटीशी भेट असून याचा महिला प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे. रिक्षाचालक संघटनेच्या या ऑफर मुळे पुण्यातील बहिणींचा प्रवास सुखकर तर होणार आहेच परंतु त्यांच्या पैशाची बचतही होणार आहे. त्यामुळे राज्यभरातून पुण्यातील रिक्षावाला संघटनेचे कौतुक केलं जात आहे.