Ram Mandir Bomb Threat : राम मंदिर उडवण्याची धमकी; स्वतःला दाऊदचा माणूस म्हणवणाऱ्या आरोपीला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ram Mandir Bomb Threat : उद्या २२ जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराचे उदघाटन होणार असून संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातून राम भक्त अयोध्येसाठी रवाना झाले असून भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सुद्धा फुले आणि दिव्यांच्या रोषणाईने सजली आहे. मात्र याच आनंदाच्या काळात राम मंदिर उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांनी या धमकी देणाऱ्या आरोपीला आता ताब्यात घेतलं आहे.

दाऊदचा माणूस असल्याचा आरोपीचा दावा – Ram Mandir Bomb Threat

21 वर्षीय मोहम्मद इब्राहिम असे सदर आरोपीचे आहे. तो बिहारच्या अररिया जिल्ह्यातील पलासी पोलीस स्टेशन हद्दीतील बलुआ गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने अररिया पोलिसांना फोन करत आपण छोटा शकील बोलत असल्याचे संगितलं. आपण दाऊद इब्राहिमच्या टोळीतील दहशतवादी असून ज्या दिवशी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे त्याच दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला राम मंदिरात बॉम्बस्फोट घडवणार Ram (Mandir Bomb Threat) असल्याचा इशारा पोलिसांना दिला.

अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या –

यांनतर पोलीस विभाग खडबडून जागा झाला. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आधी तांत्रिक शाखेतून आरोपीं कॉल डिटेल्स तपासण्यात आले. तेव्हा ज्या व्यक्तीने धमकी दिली तो पलासी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र या फोन कॉल मुळे काही काळ का होईना मोठी खळबळ उडाली होती.