Ram Mandir Inauguration । आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांचा शुभ मुहूर्त असून संपूर्ण देशातून ८००० हुन अधिक दिग्गज अयोध्येत दाखल झाले आहेत. तसेच लाखो सर्वसामान्य रामभक्त अयोध्येला गेले आहेत. मात्र भाजपचे जेष्ठ नेते आणि ज्यांनी राम मंदिरासाठी रथयात्रा काढली ते लालकृष्ण अडवाणी या भव्य दिव्य सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. यामागील कारण सुद्धा समोर आलं आहे.
अडवाणी का उपस्थित राहणार नाहीत – Ram Mandir Inauguration
सध्या लालकृष्ण अडवाणी यांचे वय 96 वर्षे आहे. त्यातच अयोध्येत थंडीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. , हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार अयोध्येत आज थंडीचा दिवस आहे..अयोध्येत आज सकाळी ६ वाजता अयोध्येत ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, परंतु हळू हळू थंडी कमी होत आहे.
अडवाणी म्हणाले, इतक्या वर्षांनंतर आम्ही भारताच्या ‘स्व’ चे प्रतीक पुन्हा तयार केले. ते आमच्या प्रयत्नांच्या जोरावर झाले. अशा भव्य सोहळ्याला (Ram Mandir Inauguration) प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण श्री रामाचे मंदिर हे केवळ पूजेचे मंदिर नाही, तर या देशाचे पावित्र्य आणि या देशाच्या प्रतिष्ठेच्या स्थापनेचे हे निमित्त आहे.
मोदी- अडवाणी यांच्यात अजूनही वाद??
खरं तर लालकृष्ण अडवाणी हे भाजपंचे जेष्ठ नेते आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत भाजपचे नेतृत्व केलं होत. लालकृष्ण अडवाणी यांनीच रथयात्रा काढली होती आणि मंदिर वही बनायेंगे अशी घोषणा दिली होती. मात्र २०१४ ला केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांचं महत्व कमी झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या, भाजपच्या धोरणात्मक निर्णयात सुद्धा त्यांचा सहभाग हळू हळू कमी कमी होत गेला होता. त्यातच आता राम मंदिराच्या या भव्य दिव्य सोहळ्याला अडवाणी गैरहजर राहिल्याने पुनः एकदा मोदी- अडवाणी मध्ये वाद सुरु आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय.